नगर (दि.13) : नेवासे तालुक्यातील कौठा येथील दहावीची विद्यार्थीनी ज्ञानेश्रवरी आमृत काळे या विद्यार्थिनीचा वाढदिवस दि. 9 एप्रिल रोजी होता.पंरतु राज्यात कोरोनामुळे शासनाने सर्वत्र देशात लॉकडाऊन केला असून गोरगरीब जनतेला रोजगार नसल्याने त्यांची परिस्थिती कठिण असल्यानेच आपण आपला वाढदिवस साजरा करणे योग्य नसल्याचे सांगून तिने हा खर्च पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून देण्यास सांगितले.
ज्ञानेश्वर आमृत काळे हिने आपला वाढदिवस साजरा न करता हा खर्च पंतप्रधान, मुख्यमंत्री सहायता निधीला दिला. ही रक्कम रस्तापूरचे कामगार तलाठी नांगरे यांच्याकडे सुपूर्द केला. कौठा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष माजी संरपच रावसाहेब काळे, ऋषिकेश काळे, मंच्छिद्र डाके, पोलिस पाटील शेषराव काळे यांनी वैयक्तिक निधी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी काही रकमेचा चेक नेवासे तहसीलदार यांच्या आदेशानुसार कामगार तलाठी नांगरे यांच्याकडे सुपूर्द केला.