पेट्रोल पंपाचा अहवाल तहसीलदारांकडे दाखल
नगर (दि.03) : लॉकडाऊनच्या काळात नगर-पुणे रोडवरील स्टेशन रस्त्यावरील कोठी परिसरातील पेट्रोल पंप चालकाने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. तसेच पेट्रोल पंपावर तपासणी करण्यासाठी गेलेल्या महसूल कर्मचार्यांबरोबर पेट्रोल पंपाच्या कर्मचार्यांनी हुज्जत घालत माहिती देण्यास नकार दिला. पेट्रोल पंप चालकाने जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे पालन न करता पंप सुरू ठेवला असल्याने त्यांचा अहवाल महसूलचे कर्मचार्यांनी तहसीलदार यांना दिला आहे.
कोरोना विषाणूने थैमान घातल्यानंतर पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नगर शहरासह जिल्ह्यात लॉकडॉऊनची अमंलबजावणी केली. तसेच पेट्रोल पंप चालकांना सकाळी 5 ते 9 पेट्रोल तर डिझेल 5 ते 12 यावेळा देण्यासाठी सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर नगरचे तहसीलदार यांनी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचार्यांना शहरातील पेट्रोल पंपाची तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तहसील कार्यालयातील कर्मचारी नगर - पुणे रस्त्यावरील स्टेशन रोडवरील कोठी परिसरातील पेट्रोल पंप येथे तपासणी करण्यासाठी गेले. महसूल विभागाचे कर्मचारी स्टेशनरोडवरील पेट्रोल पंपाची तपासणी करत असताना जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे कर्मचार्यांच्या लक्षात आले. तसेच पेट्रोल व डिझेल किती आहे याची माहिती घेत असताना पंपावरील कर्मचार्यांनी वाद घातला. उलट तुमची तक्रार करू असा दम कर्मचार्यांना दिला. संबंधित कर्मचार्यांनी पेट्रोल पंपाचा अहवाल तयार करून नगरचे तहसीलदार यांच्याकडे दाखल केला. पेट्रोल पंपावर तहसीलदार काय कारवाई करतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
नगर शहरासह जिल्ह्यात पेट्रोल पंप जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या वेळेनुसार सुरु ओहत. परंतु काही ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन होताना दिसत नाही. तसेच काही पेट्रोल पंपावरील काम करणारे कर्मचारी सर्व नियम धाब्यावर बसून बाटलीमध्येच पेट्रोल देत आहेत. याकडे पोलिस प्रशासन व पुरवठा विभागाचे सर्रास दुर्लक्ष होत आहे.

Tags:
Ahmednagar