किराना दुकानात रास्त दरांचे फलक लावावेत
अॅड.सुरेश लगड यांची जिल्हा पुरवाठा विभागाकडे मागणी
नगर (दि.03) : येथील अनेक किराणा दुकानदार चढ्या भावाने त्यांचा किराणा विकतात. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अनेकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे मागणी करतो कि, किराणा मालाचे काय दर असावेत ? तसे दर अथवा त्याची यादी प्रत्येक किराणा दुकानदार यांना देता येईल का ? जर देता येत असेल तर ती यादी त्या-त्या किराणा दुकानात दर्शनी भागात लावण्याबाबत आदेश दिले, तर फार बरे होईल. सध्या काही दुकानात होणारी लुट थांबवता येईल, तसेच ग्राहकांच्या तक्रारी येणार नाहीत.असे अॅड.लगड यांनी म्हंटले आहे.
या मागणीचा विचार जिल्हा पुरवठा विभागाने गांभीर्याने केल्यास , लॉकडाउनमधे सर्वसामान्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा जिल्हा पुरवठा अधिकारी, अहमदनगर यांच्याकडे व्यक्त केली. आपण किराणा दुकानात मालाचे रास्त दराची यादी लावणेबाबत आदेश प्रारीत करावे, अशी मागणी विधीज्ञ सुरेश लगड मो.नं.9423793535 यांनी केली आहे .

Tags:
Ahmednagar