वृक्षरोपानां पाणी देवुन केला ‘जागतिक वसुंधरा दिन’ साजरा : हरियाली संस्थेचा उपक्रम


नगर (दि.22):  सार्वजनिक व जाहिर कार्यक्रम रद्द करून रस्त्याच्या दुतर्फा लागवड करण्यात आलेल्या वृक्षारोपानां पाणी देवुन ‘जागतिक वसुंधरा दिन’ साजरा करण्यात आला.

लाँकडाऊन असल्यामुळे जाहिर कार्यक्रमास फाटा देवुन सामाजिक अंतर राखत तारकपुर रस्त्याच्या दुतर्फा संस्थेने दोन वर्षापुर्वी व मागिल वर्षी लागवड केलेल्या ‘बहवा’ या दुर्मिळ व औषधी प्रजातिच्या आणि पिवळ्या फुलांनी लगडणाऱ्या या देखण्या वृक्षरोपानां टँकर उपलब्ध न होताही ड्रममधुन बाजुच्या ठीकाणाहुन पाणी घेवुन पाणी देण्यात आले.

यापुढेही उन्हाळा असल्याने तिन दिवसांनी टँकरची व्यवस्था करुन या रोपांबरोबरच किल्ला परिसर व शहरातील इतर ठीकाणी लागवड केलेल्या वृक्षांनां पाणी देण्याचे येथील हरियाली संस्थेचे नियोजन आहे. या उपक्रमात अध्यक्ष सुरेश खामकर, संदीप पावसे, रमेश घुले, तुलसीभाई पालीवाल, ठाकुरदास परदेशी आदि सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post