नेवाशात लाखो रुपयांच्या गुटख्यासह, सुगंधी तंबाखुजन्य पदार्थ जप्त


नेवाशात लाखो रुपयांचा गुटखा, मावा, सुगंधी तंबाखुजन्य पदार्थ जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

नगर (दि.18) :  नेवासा येथे जुन्या कोर्टाजवळ वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून 2 लाख 72 हजार 120 रुपयांचा गुटखा, मावा, सुगंधी तंबाखू इ. तंबाखूजन्य पदार्थाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या छाप्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली  आहे.

या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोहेल जुबेर शेख, जैन्नादिन बाबा शेख, सुलेमान ईसाक मनियार (सर्व रा.जुनी कोर्टगल्ली, नेवासा) या तीघांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेली माहिती अशी की, राहत्या घरात गुटखा, सुंगधी तंबाखू, मावा मशिनच्या साहय्याने मावा तयार केला जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. या माहितीनुसार नेवासा येथील जुन्या कोर्टगल्लीत पोलिसांनी पंचासमक्ष छापा टाकून सोहेल जुबेर शेख, जैन्नादिन बाबा शेख, सुलेमान ईसाक मनियार (सर्व रा.जुनी कोर्टगल्ली, नेवासा) यांना ताब्यात घेतले आहे. जुन्या कोर्टगल्ली (नेवासा) येथील वेगवेगळ्या ठिकाणीहून 2 लाख 72 हजार 120 रुपये किंमतीचा हिरा गुटखा, तयार मावा, सुगंधी तंबाखू, सुपारी, मावा तयार करण्यासाठीची मशिन असा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, श्रीरामपूर पोलीस उपअधीक्षक दिपाली काळे-कांबळे, शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकाँ दत्ता गव्हाणे, मनोज गोसावी, पोना रविंद्र कर्डिले, संतोष लोढे, सचिन आडबल, विश्‍वास बेरड, पोकाँ राहुल सोळुंके, प्रकाश वाघ, रविंद्र घुंगासे, शिवाजी ढाकणे, मपोकाँ सोनाली साठे, चापोकाँ सचिन कोळेकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post