नगर (दि.18) : येथील बालिकाश्रम रोडलगत असलेल्या बोरुडे मळा परिसरामध्ये सीना नदीच्या पलीकडच्या बाजूस असलेल्या शेतात रात्री साडेअकराच्या सुमारास एक काळवीट जखमी अवस्थेत पडून असल्याची माहिती येथील युवकांना समजली.
यानंतर माजी उपमहापौर अनिल बोरुडे तसेच संदीप बोरूडे पाटील, अजित बोरूडे, विजय बनकर, सचिन लडकत, गणेश ऊदावंत, भाऊसाहेब पवार, शरद बोरूडे, भूषण बोरूडे, दिनेश बोरूडे यांनी जखमी अवस्थेत पडलेल्या काळवटाकडे धाव घेतली. सदरचे काळविट हे फासात अडकले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या हरणाची त्यांनी या फासातून सुटका केली.
याबाबत निसर्गमित्र व व्याघ्र संरक्षण समिती सदस्य मंदार साबळे यांना कळवले. साबळे यांनी उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांना सांगितले. वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव पोकळे,वनपाल वनरक्षक सचिन शहाणे यांनी त्यास तेथून आणले व त्याच्यावर जिल्हा पशु चिकित्सलयात उपचार करण्यात आले.या हरणाच्या पायाला फासात अडकल्याने थोडी जखम झाली असून त्यास कुत्र्यांनीही चावा घेतला आहे.त्यावर त्या अनुषंगाने उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यास निसर्गात मुक्त करण्यात येणार आहे.
