26 परदेशी नागरिकांना नगरमध्ये अटक : 24 पर्यंत पोलिस कोठडी

नगर (दि.18) : 26 परदेशी नागरिकांना दि.24 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी तर तीन भारतीयांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांनी दिली.

नगर जिल्ह्यातील भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन तसेच नेवासा व जामखेड पोलीस ठाण्यात मरकजशी संबंधित सापडलेले परदेशी नागरिक व त्यांना दुभाषी म्हणून मदत करणारे काही भारतीय नागरिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री  26  परदेशी नागरिक व 3 भारतीय नागरिकांना अटक केली, आज (दि.18) जिल्हा सत्र न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आले, न्यायालयाने  26 परदेशी नागरिकांना दि.24 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली, तर  तिघा भारतीय नागरिकांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले .

संबंधित प्रकरणातील दोन परदेशी नागरिक व अन्य भारतीय नागरिक करोना विलगीकरण कक्षात असल्याने त्यांच्या अटकेची कार्यवाही बाकी आहे. नगर शहरातील मुकुंदनगर भागातील धार्मिक स्थळामध्ये 9 परदेशी नागरिक व  दोन भारतीय दुभाषींनी आश्रय घेतला होता. या सर्वांविरुद्ध भादंविक 188, 269, 270, 290, तसेच महाराष्ट्र पोलिस कारदा कलम 37 (1) (3) 135, महाराष्ट्र कोविड-19 अंमलबजावणी कायदा कलम 19 तसेच संसर्ग रोग कायदा कलम 2, 3, 4 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 59 ब, परकीय नागरिक कायदा कलम 14 ब अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

परदेशी नागरीकांमध्ये जिबुती, बेनिन, डिकोटा, आयव्हरी कोस्ट, घाना, इंडोनिशिया, ब्रुनई या देशातील हे नागरिक आहेत. त्यांना वास्तव्य करण्यात मदत करणार्‍यांविरुध्द यापूर्वीच गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यातील 29 जनांना स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री अटक केली होती. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post