पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गरजूंना जेवणाचा आधार
नगर (दि.06) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात शहरातील सर्वसामान्य गरजू, गोर-गरीबांना पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने जेवणाचा आधार दिला जात आहे. सदर उपक्रम आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून, दररोज चारशे ते पाचशे नागरिकांना जेवण व फळ दिले जात आहे. नगर तहसिलदार उमेश पाटील यांच्या हस्ते दिपक हॉस्पिटल येथील विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या नागरिकांसह पोलीस प्रशासन व गरजूंना जेवणाचे वाटप करण्यात आले.
लॉकडाऊन मध्ये हातावर पोट असलेल्या कामगारांसह, गोर-गरीब, सर्वसामान्य गरजूंचा रोजगार बुडाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही जाणीव ठेऊन पार्थ पवार फाऊंडेशनचे सदस्य दररोज सकाळी जेवण बनवून ते गरजूंना शहर व शहरालगत विविध ठिकाणी पोहच करण्याचे काम करीत आहे. फाऊंडेशनच्या वतीने दररोज चारशे ते पाचशे नागरिकांना एक वेळचे जेवण फळांसह दिले जात असून, लॉकडाऊन हटे पर्यंत हे सामाजिक कार्य अविरत चालू राहणार असल्याची माहिती अॅड.तौसिफ बागवान यांनी दिली.
या उपक्रमासाठी अॅड. बागवान, आकाश दिघे, इमरान बागवान, धनंजय केरुळकर, शादाब खान, मौजम सय्यद, माजिद शेख, अॅड. यासर तांबटकर, निलेश आढाव, शफिक शेख, सागर कनोजिया, नदिम शेख आदि परिश्रम घेत आहे.
Tags:
Ahmednagar