भूगोलाची परीक्षा रद्द करा : सुनिल गाडगे

भूगोलाची परीक्षा रद्द करा ; महाराष्ट्र शिक्षक भारती संघटनेची मागणी : सुनिल गाडगे

नगर (दि.06) : लॉकडाऊनमुळे इयत्ता दहावीचा भूगोलचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. परिणामी दहावीची भूगोल विषयाची परीक्षा रद्द करावी आणि विद्याथ्यांना सरासरी गुण द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती च्या वतीने राज्य सचिव तथा शिक्षक नेते सुनिल गाडगे यांनी केली आहे.

देशात करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि राज्यात संचारबंदी घोषित करण्यात आली. तरी या काळात दहावीची परीक्षा सुरू ठेवण्यात आली होती. मात्र, यानंतर परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात आल्यावर राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यामुळे इयत्ता दहावीचा 23 मार्च रोजी होणारा भूगोलाचा पेपर होऊ शकला नाही. आता ही परीक्षा कधी होईल याबाबत 14 एप्रिलनंतर निर्णय घेण्यात येईल, असे सरकारतर्फ सांगण्यात आले. मात्र आता ही परिस्थिती आणखीच गंभीर होताना दिसत आहे. यामुळे पालकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारने दहावीची भूगोल विषयाची 40 गुणांची राहिलेली परीक्षा रद्द करावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे, असे शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे जालींदर  सरोदे  राज्य सचिव सुनिल गाडगे  यांनी सांगितले.

विद्याथ्यांची 550  गुणांची परीक्षा झाली आहे. भूगोलच्या 50 गुणांपैकी 10 गुणांची परीक्षा शाळेत घेण्यात आली आहे. यामुळे सरकारने 40 गुणांची लेखी परीक्षा रद्द करावी व विद्याथ्यांना त्या विषयात सरासरी गुण द्यावे किंवा 550 गुणांपैकी निकाल जाहीर करावा, अशी मागणी  गाडगे यांनी केली आहे.

सध्या अकरावी प्रवेशासाठी बेस्ट ऑफ फाइव्हचे गुण धरले जातात. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक ताण न देता परीक्षा रद्द करून दिलासा द्यावा, असे संघटनेचे  जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, सचिव विजय कराळे कार्याध्यक्ष बाबासाहेब  लोंढे उच्च माध्यमिक जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष डॉ.किशोर डोंगरे,  श्रीकांत गाडगे, विलास गाडगे, संपत वाळुंज, नवनाथ घोरपडे, हनुमंत रायकर, सुदाम दिघे,  किसन सोनवणे, मोहमंद समी शेख, संजय पवार, संभाजी चौधरी, अशोक धनवडे, जॉन सोनवणे, रेवन घंगाळे, संतोष मगर, अशोक अन्हाड, योगेश हराळे, काशिनाथ मते, जिल्हा महिलाध्यक्ष आशा मगर, जिल्हा कार्याध्यक्ष मिनाक्षी सुर्यवंशी, सचिव विभावरी रोकडे, शंकुतला वाळुंज,संध्या गावडे,  अनघा सासवडकर, छाया लष्करे, जया गागरे आदींनी ही मागणी  केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post