मनपा स्वच्छता निरीक्षकास मारहाण करणारे आठ जण जेरबंद

 
मनपा स्वच्छता निरीक्षकास मारहाण करणारे 

आठ जण जेरबंद 

स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात

नगर (दि.05) : महापालिकेच्या वतीने कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने नागापूर आणि जवळील परिसरात औषध फवारणी सुरु असताना महानगरपालिकेच्या 2 स्वच्छता निरीक्षकांना बेदम मारहाण करणार्‍या 7 जणांना आणि त्यांना आश्रय देणारा 1 अशा 8 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करुन मोठ्या शिताफीने रविवारी (दि.5) दुपारी एमआयडीसी परिसरातील डोंगरात पकडले. 

पकडलेल्यांमध्ये निलेश भालचंद्र. भाकरे (वय 36, रा.चैतन्य हॉटेल समोर,नागापूर,नगर), सुंदर उर्फ विकास विजय खंडागळे (वय 32, वडगाव गुप्ता, नगर), प्रदिप भाऊसाहेब कोहक (वय 28, रा. नवनागापूर, नगर), संजय कुर्लेश इंगळे (वय 38, रासनफार्मा चौक, नागापूर,नगर), प्रशांत राजू म्हस्के (वय 38, रा.साईनगर, वडगांव रोड, नागापूर, नगर), विजय राजू चौणापूरे (वय 35, रा.नवनागापूर, नगर), रईस गफ्फार अन्सारी (वय 39, नागापूर,नगर) यांचा समावेश आहे.

महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक सुरेश एकनाथ वाघ हे दि.2 एप्रिल रोजी त्यांचे सोबतचे कर्मचार्‍यांसह कोव्हीड -19 प्रार्दुभाव चालू असल्याने नागापूर गावठाण मनपा ऑफीसजवळ औषध फवारणीचे काम चालू असताना त्यांना विरोध करून आरोपी निलेश भाकरे व त्याचेसोबत इसमांनी लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण केली. त्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन ठाण्यात गु.र.नं 1171/2020 भादंवि कलम 307, 353, 332, 290 सह, म.पो.का.कलम 37(3),135 तसेच कोव्हीड 19 उपाययोजनेचे कलम 11, साथीचे रोगप्रतिबंधक कायदा कलम 2,3,4 प्रमाणे दाखल झाला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांच्या पथकातील पो.हे.कॉ. मनोज गोसावी, विजयकुमार वेठेकर, संदिप घोडके, दत्तात्रय गव्हाणे, पो.ना. रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, सचिन अडबल, रविकिरण सोनटक्के, विजय ठोंबरे, पो.कॉ.राहूल सोळूके, शिवाजी ढाकणे, प्रकाश वाघ, संदीप दरंदले, रणजीत जाधव यांनी गवळीवाडा परिसरात आकाश शिंदे याच्या राहते घरी सदर घटनेतील आरोपी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथक वेगवेगळया दोन खाजगी वाहनात घराजवळ गेले असता पोलिसांची चाहूल लागल्याने घरातील 6 ते 7 इसम गवळीवाडा परिसरातील डोंगराकडे पळाले. पथकातील दोन वाहनाने दोन वेगवेगळ्या आडवळणी रस्त्याने त्यांचा 3 ते 4 कि.मी पाठलाग करून त्यांना शिताफीने कुंड परिसरातील डोंगरात विळद ता.जि.अहमदनगर येथे ताब्यात घेतले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, व उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post