ट्रकचे नगर-दौंड रस्त्यावर शीर्षासन ; चालक आणि वाहक दोघेही सुखरूप

नगर (दि.20) : सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे गेली एक महिन्यापासून रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी शासनाने जीवनाश्यक वस्तु वाहतूकीला परवानगी दिल्याने रस्त्यावर तुरळक वाहनाची वाहतूक वाढली असताना नगर-दौंड रस्त्यावर सांगावी फाट्याजवळ रविवारी बीडकडून दौंडकडे भरधाव वेगाने जाणार्या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यावर ट्रक रस्त्याच्या कडेला खाली जावून पुढील भागावर चाकांवरती उभा होवून अपघात झाला. सदर अपघातामध्ये चालक वाहक सुखरूप असुन कोणतीही जीवीत हानी झाली नाही. मात्र, वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर-दौंड रोडवर काष्टी पासून पुढे सांगवी फाटा येथे रविवार दि.19 रोजी सकाळी साडे आठ वाजता गाडी नंबर एम.एच.12 आर.एन. 3758 हा ट्रक बीडहून नगरमार्गे दौंडच्या दिशेने भरधाव वेगाने निघाला असता ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी नियंत्रित करताना रस्त्यावरील ट्रक खाली शेतात येवून पुढील दर्शनी भागावर मागील चाके वर होवून उभा राहिला. पुढील भागात असलेला चालक मात्र गाडीत अडकला असताना भोवताली असलेले राहुल नलगे, अनिल भोईटे यांच्यासह तरुण मदतीला धावले आणि चालकाला सुखरुप बाहेर काढले.

Post a Comment

Previous Post Next Post