नगर (दि.20) : नगर एमआयडीसीतील कारखाने सोमवारपासून ( दि.21एप्रिल ) सुरू करण्याची उद्योजकांची तयारी होती. परवानगीसाठी एमआयडीसीतील कार्यालयाला पाठवावयाच्या वेबसाईटवरील अडणीमुळे सोमवारी कंपनीमध्ये कामकाज सुरु झाले नसल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, उद्यापासून दि.21 पासून कामकाज सुरु होण्याची शक्यता आहे.
नगरच्या एमआयडीसीतील सुमारे 60 ते 70 टक्के कामगार आहेत. यातील बहुतांशी कर्मचारी हे परराज्यामधून आलेले असतात. यामुळे जरी वेबसाईटची अडचण सुटली तरी पुढील काळात कंपनी व्यवस्थापनासमोर कामगारांची अडचण ‘आ’ वासून उभी राहणार आहे. बहुतांश कर्मचारी परराज्यामधून आलेले असल्याने आता कर्मचार्यांच्या शोधात व्यवस्थापनाला पायपीट करावी लागणार आहे. त्यातच अनेक नियमांचे काटकेकोरपणे पालन करावे लागणार आहे. सध्यास्थितीत नगर एमआयडसीमध्ये 40 ते 50 टक्के कर्मचारी हे परराज्यामधुन आलेले होते, आता त्यांनी आपले घर गाठले आहे. एकाचवेळी परराज्यातुन आलेल्या कर्मचारीवर्गाची एकाचवेळी जाण्याची ही पहीली वेळ असल्याने अनेक अडचणींना उद्योजकांना सामोरे जावे लागणार आहे.
‘करोना’ बाधित प्रदेशापासून दूर असलेल्या तसेच महापालिका हद्दीबाहेर असलेल्या औद्योगिक क्षेत्राला कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यभरातील औद्योगिक चाके सोमवारपासून फिरण्यास सुरुवात होणार अशी शक्यता वर्तवली गेली होती आहे. मात्र, ऐनवेळी वेगसाईटने घोळ करुन अडचणीत अजून अडचण निर्माण केली.