नगर (दि.21) : खेरले परमानंद (ता.नेवासा) येथील सराफाला लुटणारे दोन आरोपी गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. श्रीरामपूरच्या संजयनगरमधून आरोपींना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपीमध्ये शाहरुख सय्यद (वय 25, रा.चाँदनगर, बेलापूर, ता.श्रीरामपूर), अलीश अजीज शेख (वय 40, रा.संजयनगर, श्रीरामपूर) असे पकडण्यात आलेल्याची नावे आहेत.
माहिती अशी की, दि.1 जानेवारीला पानेगाव ते खेडले परमानंद या रस्त्याने पानेगाव शिवारातून सराफ सोने-चांदीचे दागिने बँगेत टाकून ते दुकान बंद करून जात होते. या दरम्यान, तीन अनओळखी इसमांनी त्याच्या डोळ्यात मिरची फूड फेकून 7 लाख 90 हजार 778 रुपयांचा सोनेचांदीचे दागिने बळजबरीने चोरून नेली होती. या घटनेतील शाहरुख सय्यद व अलिश शेख ही चोरटे संजयनगर (श्रीरामपूर) येथे आल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार संजयनगर येथे सापळा रचून सय्यद व शेख याना पकडले. यावेळी दोघांना ही पोलिस खाक्या दाखवताचा, सदर गुन्हा केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही चोरट्यांना पुढील तपास करीत सोनई पोलीसांच्या ताब्यात दिले.
जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे-कांबळे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोहेकाँ मनोहर गोसावी, पोना रविंद्र कर्डिले, संतोष लोढे, दिपक शिंदे, राहुल सोळुंके, प्रकाश वाघ, सुमेधा वाघमारे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली