आणखी १९ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह


नगर, (दि.२१) : जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेले १९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.

या व्यक्ती जामखेड, नगर, नेवासा, कोपरगाव, पारनेर येथील असल्याचे त्यांनी सांगितले.  या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post