वृत्तपत्र वितरणावरील निर्बंध तातडीने मागे घ्यावे
प्रेस संपादक व पत्रकार सेव संघाची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
मुंबई, (दि.20) : कोवीड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने परिपत्रक काढून 20 तारखेपासून वृत्तपत्र सुरु करण्यास परवानगी दिली असली तरी त्यावर वितरणास बंदी घातलेली आहे. वृत्तपत्र बंद असल्याने अगोदरच काही पत्रकारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे, आणि वृत्तपत्राचे वितरण होत नसेल तर वृत्तपत्रावरील अडचणी आणखीन वाढ होणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने वृत्तपत्र पुर्णपणे सुरक्षित असून वृत्तपत्रामुळे कोरोनाचा संसर्ग होत नसल्याचे जाहीर केले आहे. लॉकडाऊनमुळे लोकांना घराबाहेर पडणे शक्य नसल्याने अंक खरेदी करण्यासाठी स्टॉलवर जाने शक्य नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अडचणीत सापडलेल्या वृत्तपत्र अंक वितरणातील निर्बंध हटवून वृत्तपत्र घरोघरी वितरणास परवानगी देणारे परिपत्रक जारी करावे अशी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आंबेगावे, डी.टी.यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे.

Tags:
Maharashtra