दुचाकीवर राजस्थानला पोहचण्याचा अयशस्वी प्रयत्न



दुचाकीवर राजस्थानला पोहचण्याचा अयशस्वी प्रयत्न

 दुचाकीसह सहा जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात 

नगर (दि.17) : श्रीगोंदा परिसरामधून राजस्थानला दुचाकीवर निघालेल्या 6 दुचाकीस्वारांना पोलिसांनी लोणी व्यंकनाथ शिवरात ताब्यात घेतल्याने त्यांचा राजस्थानला जाण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. सदरचे सहा व्यक्ती हे पोलिसांची नजर चुकवून राजस्थानला जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तीन दुचाकीघेवून सहाजन  राजस्थानला निघाले होते. यामध्ये लांगाराम कुमावत, जठराम कुमावत, धनुराम कुमावत, अंबाराम कुमावत, कमलाराम कुमावत, हेमराज कुमावत यांचा समावेश आहे. राजस्थान, जिल्हा बाडमेरच्या दिशेने प्रवास करत निघाले असताना त्यांना तालुक्याच्या हद्दीत आल्यानंतर पोलिसांनी लोणी व्यंकनाथ शिवारात चेक पोष्ट वर त्यांना ताब्यात घेतले आहे. 

बाहेरील राज्यामधून आलेले कामगारांच्या कानावर अनेक अफवा जात असल्याने तसेच त्यांना मराठी स्पष्ट समजत नसल्याने त्यांची अवस्था चलबिचल होत आहे. यामधूनच त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याचे दिसत आहे. यातीलच सदरचा प्रकार असून राजस्थान राज्यपर्यंत प्रवास करत जाण्याचा त्यांचा मानस होता असे दिसत आहे, मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे त्यांच्यावर पुढील कारवाई पोलिस करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post