मोरया पतसंस्थेस 15 लाख 16 हजार रुपयांचा नफा

नगर  (दि.17) : माळीवाडा येथील मोरया नागरी सहकारी पतसंस्थेला आर्थिक वर्ष २०१९-२०२० या सालात १५ लाख १६ हजार रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन संजय चाफे यांनी दिली.

संस्थापक भगवान फुलसौंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेने अल्पवधीत चांगली कामगिरी केली असल्याचे त्यांनी सांगितले. पतसंथेच्या मध्यमातून गरजूंना कर्ज वाटप, वाहन कर्ज आदी विविध प्रकारच्या माध्यमातून कामाचा आलेख उंचावत आहे. त्यासाठी सर्व संचालक मंडळ यांचे मोलाचे सहकार्य असल्याचे चाफे यांनी सांगितले.

यासाठी व्हाइस चेअरमन नितीन ठाणेकर, विष्णू फुलसौंदर, गोरक्षनाथ हजारे, मच्छिन्द्र फुलसौंदर, विजय कोल्हे, रत्नमाला फुलसौंदर, संगीता कावळे आदींचे सहकार्य मिळाले.

Post a Comment

Previous Post Next Post