नगर (दि.02) : देशात व राज्यात महाभयंकर कोरोना विषाणूने थैमान घातले असून त्यावर उपाय म्हणून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यात रक्तचा तुटवडा भासू लागल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला रक्तदान करण्याविषयायी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून नगरच्या नंदनवन मित्र मंडळ व नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. सदरील शिबीर कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील रक्तपेढी मध्ये घेण्यात आले. यावेळी युवकांनी टप्या टप्याने येऊन रक्तदानाचा अधिकार बजावला अशी माहिती मंडळाचे मार्गदर्शक दत्ता जाधव यांनी दिली.
यावेळी बोलताना दत्ता जाधव म्हणाले कि, जेव्हा पासून संचारबंदी लागू करण्यात आली तेव्हा पासून आम्ही जनतेच्या संपर्कात आहोत. त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी भासू नये. आमच्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये हेल्पलाईनच्या माध्यमातून नागरिकांना घरपोच जीवनावश्य्क वस्तूचे वितरण तसेच संजयनगर व गाजीनगर लोकवस्तीमध्ये मोफत भाजीपाला, प्रभागात आरोग्याच्या दृष्टीने मनपाच्या माध्यमातुन औषध फवारणी आदी उपाय योजना करण्यात आल्या.
यावेळी रक्तदान शिबीर मध्ये आदेश जाधव, महेंद्र वारूळे, वैजिनाथ लोखंडे, राजू वाल्हेकर, किशोर कानडे, गजानन टिमकीरे, हर्षल भनभणे, विशाल गायकवाड, स्वप्नील घटी, अक्षय गोंधळे, अनिकेत भांड, अभिजित गोंधळे, अन्वर शेख आदींनी रक्तदान केले. तसेच डॉ. शेडाळे ,डॉ. शेख ,डॉ. तांदळे,मोरे ,तोडमल यांचे सहकार्य मिळाले.

Tags:
Ahmednagar