ठेकेदारावर गुन्हा दाखल करा : जाधव
नगर, (दि.14): मनपा कर्मचार्यांनी संप केला होता, त्या संपात नगर शहरातील कचरा उचलणार्या स्वयंभू ट्रान्सपोर्ट या ठेकेदार संस्थेचाही यात सहभागी झाली होती. नागरिकांना वेठीस धरणार्या व कर्तव्यात हलगर्जीपणा करणार्या दोषी ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणीे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानंतर उपजिल्हाधिकारी अजय मोरे यांनी मनपाचे आयुक्त यांनी याप्रकरणी कार्यवाही करावी असे आदेश दिले आहे.
कोरोना रोगाचा संसर्ग झाल्याने जनतेत घबराटीचे वातावरण आहे. अशा आणीबाणीच्या जागतिक आपत्तीच्या काळात कोणत्त्याही सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी यंत्रणांनी कोणत्याही कारणास्तव काम करण्यास टाळाटाळ करणे अपेक्षित नाही. तरीदेखील अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचा-यानी दिनांक 4 व 5 एप्रिल रोजी संप पुकारला होता. पण या संपाशी नगर शहरातील कचरा उचलणा-या स्वरंभू ट्रान्सपोर्ट या ठेकेदार संस्थेने कचरा उचलणेचे काम बंद केले. ठेकेदाराची ही कृती पूर्ण पणे बेकारदेशीर असून या बेकारदेशीर संपात सहभागी होऊन आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल दोषी ठेकेदारावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी जाधव यांनी केली आहे. यांबाबतचे निवेदन त्यांनी मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्याकडे केली आहे. गिरीश जाधव यानी आपली तक्रार आपले सरकार या वेब पोर्टलवर दाखल केले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने दखल घेत उपजिल्हाधिकारी अजय मोरे यांनी मनपा आयुक्त यांना याप्रकरणी नियामोचित कार्यवाही करावी असे आदेश दिले आहे. आयुक्त ठेकेदारावर काय कारवाई करणार याकडे कर्मचार्यांचे लक्ष लागले आहे.
मनपा संपात ठेकेदाराने का सहभाग घेतला याची चौकशी करावी आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा अशी जाधव यांनी मागणी केली आहे.