नगर (दि.18) : गेल्या अनेक दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनुकंपाधारकांना जिल्हा परिषदेने ई-मेल पाठवून नियुक्ती दिली आहे. या 45 उमेदवारांना 20 एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश देण्यात आल आहे. कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन असल्याने प्राशासनाने ऑनलाईन पध्दतीने नियुक्ती दिली आहे. सदरचे नियुक्ती आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळंके यांनी दिली आहे.
सातारा जिल्हयातील अनुकंपा भरती लॉकडाउन काळात झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यातही अनुकंपाची भरती व्हावी, अशी मागणी करण्यात येत होती. जिल्हा परिषदेचे सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी या संदर्भात प्रशासनाकडे पाठपुरवा केला होता. कोरोनामुळे आरोग्य विभागाकडे रिक्त पदांची भरती करण्याच्या सूचना सरकारने जारी केल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील अनुकंपा भारतीप्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
नियुक्ती दिलेल्यामध्ये 21 आरोग्य सेवक, 14 कनिष्ठ सहाय्यक, 6 स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, 2 वरिष्ठ सहायक, 1 शिक्षक सेवक व 1 महिलेला पर्यवेक्षकपदी अशा एकूण 45 नियुक्ती देण्यात आली आहे. या सर्वांना नियुक्तीचे आदेश ई-मेल द्वारे देण्यात आले आहे.