नगर (दि.06) : कोरोना विषाणूमुळे राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या आपदग्रस्तांना सामाजिक बांधिलकी व मानवतेच्या दृष्टिकोनातून जिल्हा बँकेच्या वतीने तसेच बँकेच्या सर्व सेवकांनी एक दिवसाचा पगार असा एकूण रुपये 25 लाखाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस बँकेचे ज्येष्ठ संचालक तथा माजी आमदार शिवाजीराव कर्डिले व बँकेचे संचालक रावसाहेब शेळके यांच्या हस्ते जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था दिग्विजय आहेर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे.
या वेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, जनसंपर्क अधिकारी भारत सोले पाटील, जनसंपर्क अधिकारी हे उपस्थित होते.
या वेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, जनसंपर्क अधिकारी भारत सोले पाटील, जनसंपर्क अधिकारी हे उपस्थित होते.