दिव्यांगांना किराणा साहित्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ; शहर पोलिसांचा अनोखा उपक्रम


नगर (दि.06) : कोरोना व्हायरस संसर्गजन्य आजार नियंत्रीत ठेवण्याकरीता केंद्र शासन व राज्य शासन ठोस उपाय योजना करत आहे. कोरोना संसर्गजन्य आजाराचा समाजात प्रसार होवू नये, परिस्थिती नियंत्रणात रहावी तसेच कोणतीही व्यक्ती उपाशी राहू नये, यासाठी प्रशासन योग्य उपाययोजना करत आहेत. दिव्यांग व्यक्तींचा अडचण ओळखून पोलीस प्रशासनाने घरी जाऊन त्यांना साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

जिल्हा प्रशासन व अहमदनगर जिल्हा पोलिस दलाकडून सर्व नागरिकांना अत्यावश्यक सेवा वगळता घरात राहण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. अशी परिस्थिती असताना अहमदनगर शहर व परिसरातील दिव्यांग बांधव व त्यांचे कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलेली होती. शहर पोलिसदलाने याची दखल घेत पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे दिव्यांग बांधवांवर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी अपर अधीक्षक सागर पाटील, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी आज दिव्यांग बांधवांना उपजीविकेसाठी गहू, तांदूळ, तेल, दाल व इतर किराणा, जीवनावश्यक वस्तू साहित्याचे वाटप केलेले आहे.

शहर पोलिसांच्या या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांनी अहमदनगर शहर पोलिस दल व स्वयंसेवी संस्थेचे हरजीत वधवा, विपुल शाह, गुरकरान धुप्पर यांचे आभार मानले आहेत. शहर पोलिसांच्या या अनोख्या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे. 

यावेळी अहमदनगर पोलिस दलाच्यावतीने मिटके म्हणाले की, कोरोना या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन उच्च स्तराचे उपाययोजना करत आहेत. नागरीकांनी प्रशासना तर्फे देण्यात आलेले आदेश व सूचनांचे पालन करावे. अत्यावश्यक कारणा शिवाय रस्त्यावर फिरू नये, गर्दी करू नये, प्रशासनातील कोणत्याही व्यक्तीशी वाद घालू नये, अहमदनगर पोलिस दलास सहकार्य करावे.

Post a Comment

Previous Post Next Post