नगर : नगर शहर व परिसरात मोटारसायकल चोरी करुन बनावट कागदपत्राच्या सहाय्याने विकणारी टोळी कोतवाली पोलिसांनी उघडतीस आणली. या कारवाईत पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडील 3 लाख 15 हजार रुपये किंमतीची चोरीची वाहने जप्त केले.
माहिती अशी की, शहर परिसरातील जुना बाजार येथे रुपेश शिवनारायण वर्मा यांची चोरीस गेलेली मोपेड भोसले आखाडा परिसरात असून सदर गाडीचे बनावट कागदपत्र ती गाडी विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. यावरुन कोतवाली पोलिसांनी सापळा रचून अक्षय विठ्ठल जंगम (वय 20, रा.भोसले आखाडा, बुरुडगाव रोड) यास वाहनासह ताब्यात घेतले. त्याच्याकडे गाडीबाबत चौकशी केली असता त्याने गाडीची कागदपत्रे पोलिसांना दिली. कागदपत्रांची शहानिशा केली असता सदर कागदपत्रे बनावट असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी जंगमकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरची गाडी ही समीर ख्वाजा शेख (रा.झारेकर गल्ली), गोरख भारत सुरवाडे (वय 21, रा.शिवाजीनगर, कल्याण रोड) यांच्याकडून घेतली असल्याचे सांगून त्याकरीता आकाश आनंद दळवी (वय 21, रा.लोंढेमळा, केडगाव) याने गाडीचे बनावट कागदपत्रे बनवून दिले आहेत असे सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडील एक्सेस मोपेड, रॉयल इन्फिल्ड बुलेट, बजाज पल्सर मोटारसायकल व कॅसिनो कंपनीची मोपेड असा चार चोरीची वाहने जप्त केली आहेत.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास वाघ, पोलीस उपनिरीक्षक सतिश शिरसाठ, पोलीस नाईक गणेश शिवाजी धोत्रे, शाहिद सलीम शेख, नितीन शिवाजी शिंदे, पोकॉ.भरत मनोहर इंगळे, सुजय विल्यम हिवाळे यांनी केली.
Tags:
Ahmednagar
