नगर : शिक्षण क्षेत्राबरोबरच आजच्या विद्यार्थ्याला विविध क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. यासाठी आजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर आपले आवडीचे क्षेत्र निवडावे व त्या क्षेत्रात करिअर करुन आपला ठसा समाजासमोर उमठावा. गौरव भोसले यांनी पेंटिंग क्षेत्रात घेतलेले मास्टर ऑफ फाईन आर्ट" या शिक्षण व त्यातून केलेली प्रगती ही गौरवांकित आहे व पुढील भविष्याच्या वाटचालीस शुभेच्छा देऊन, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
गौरव गणेश भोसले यांनी तयार केलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानभवानाचे रेखाटलेले चित्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेट स्वरूपात देण्यात आले. यावेळी आ. संग्राम जगताप, नगरसेवक गणेश भोसले, सुमित कुलकर्णी व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. जगताप म्हणाले की, नगर शहर हे कलावंत व कलाकारांचे आहे. या शहरामध्ये अनेकांनी आपल्या क्षेत्रात काम करुन शहराचे नाव राज्याच्या नकाशावर झळकावले आहे. गौरवने कमी वयात पेंटिंगचे शिक्षण घेऊन काम करत आहे. तोही भविष्यकाळात उत्कृष्ट हॅण्ड पेंटिंग कलाकार म्हणून ओळख निर्माण करेल, असे ते म्हणाले.

Tags:
Ahmednagar