प्रयोगशाळेचा अहवाल पॉझिटीव्ह पण लक्षणे काहीच नाहीत;
घाबरुन जावू नये मात्र काळजी घ्या : जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे आवाहन
यात्रा-जत्रा, लग्न समारंभ आणि इतर उत्सवात गर्दी टाळण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
नगर- कोरोना विषाणूच्या संसर्गाचा नगर शहरात एक रुग्ण आढळून आला असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्याला स्वतंत्रपणे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्याच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीचे (हाय रिस्क) सहवासित चार आणि कमी जोखमीचे सहवासित (लो रिस्क) चार नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत. याशिवाय, नुकतेच परदेश दौरे करुन आलेल्या आठ नागरिकांचेही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आजअखेर, जिल्ह्यातील एकूण 20 जण हे देखरेखीखाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. दरम्यान, अशा रुग्णांच्या उपचारासाठी येणारा खर्च हा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून उपयोगात आणला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन सतर्क असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, मात्र, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि आरोग्य देखभाली संदर्भात स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन केले.
कोरोना विषाणू संसर्ग आणि त्याच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या वतीने केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी प्रसारमाध्यमांना दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे आदी उपस्थित होते.
नगर शहरात कोरोना विषाणू संसर्गाचा एक रुग्ण आढळून आला असला तरी त्याची प्रकृती स्थिर असून सर्दी, ताप, खोकला अशी कोणतीही लक्षणे त्याला आढळून आलेली नाहीत. मात्र, आरोग्य यंत्रणा पूर्णपणे तत्पर असून या रुग्णाच्या संपर्क आणि सहवासात आलेल्या प्रत्येकाची माहिती घेतली असून त्यांची तपासणी करण्यात आली आहे. इटलीहून आलेल्या एका नागरिकाच्या संपर्कात आलेल्या तीन जण, दुबईहून आलेल्या नागरिकाच्या संपर्कात आलेले आठ जण आणि परदेश दौर्याहून आल्यानंतर तपासणी केलेले आठ जण असे वीस जण देखरेखीखाली असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आपण जिल्हा रुग्णालय, बूथ हॉस्पिटल येथे स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. याशिवाय, शिर्डी येथील साई संस्थानचे हॉस्पिटल आणि शनि शिंगणापूर येथील देवस्थानचे हॉस्पिटल येथेही व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांनी स्वताहून काही बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे. गर्दीची ठिकाणे टाळावीत. चित्रपटगृहाना स्वच्छतेबाबत निर्देश दिले असून त्यांना आवश्यकता वाटत असेल तर ते बंद ठेवू शकतात. मात्र, अशा सूचना प्रशासनाने दिल्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परदेशात कामानिमित्त किंवा सहलीसाठी जाऊन आलेल्या नागरिकांनी त्यांच्या जवळच्या ग्रामीण रुग्णालयात अथवा जिल्हा रुग्णालयात त्यांची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन पुन्हा एकदा जिल्हाधिकारी श्री.द्विवेदी यांनी केले आहे.

‘त्यांच्या’ संपर्कात आलेल्यांची आरोग्य तपासणी
कोरोनाबाबत प्रयोगशाळेचा आलेला तिघांचा निगेटिव्ह व एकाचा पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर या चौघांच्या संपर्कात आलेल्या आठ जणांनी स्वत: जिल्हा शासकीय रुग्णालयात येवून माहिती दिलेली आहे. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली असून सॅम्पल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहेत. त्यांना त्यांच्या घरीच ठेवण्यात आलेले असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे तसेच त्यांना लोकांच्या संपर्कात न जाण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
‘त्या’ दोन शाळा बंद ठेवण्याचे आदेश
दुबई टूरहून नगर शहरात आलेल्या कुटुंबातील मुले ज्या खासगी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत, ‘त्या’ दोन खासगी शाळा काही दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सांगितले. तसेच शहरातील सर्वच शाळा बंद ठेवण्याबाबत शासनाकडून कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत आणि सध्यातरी तशी आवश्यकता नसल्यामुळे शाळा सुरू आहेत. मात्र, ज्या खासगी संस्थांना शाळा बंद ठेवण्याची इच्छा असेल, त्यांनी त्या शाळांना काही दिवस सुट्टी दिली तरी चालेल, असेही जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सांगितले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुरंबीकर, महापालिकेचे उपायुक्त सुनील पवार, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे आदी उपस्थित होते.
शंका समाधानासाठी टोल फ्री क्रमांक
कोरोना विषाणू आजाराच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे स्क्रीनिंग केले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी टोल फ्री 104 क्रमांक कोरोना विषयक शंका समाधानासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. याशिवाय जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर येथे कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन ( 0241-2431018 ) करण्यात आला असून तो 24 तास कार्यरत आहे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा 1077 या टोल फ्री क्रमांकावरुन नागरिकांना मूलभूत माहिती दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नवीन करोना विषाणू आजाराबद्दलच्या मार्गदर्शक सूचना सर्व संबंधितांना पाठविण्यात आल्या असून त्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
यात्रा, जत्रा असे गर्दीची ठिकाणे टाळावीत
येणार्या कोणत्याही मेसेजेचही खात्री करुन घ्या
नागरिकांनी घाबरुन जाण्याचे तसेच कोणत्याही अफवेला बळी पडण्याचे कारण नाही. त्यांनी यात्रा, जत्रा, उत्सव, लग्न समारंभ असे गर्दीची ठिकाणे टाळावीत. सर्दी, खोकला, श्वसनाला त्रास अशी लक्षणे आढळून येत असतील तर नजिकच्या रुग्णालयात अथवा जिल्हा रुग्णालयात तात्काळ उपचार घ्यावेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना विषाणू संदर्भात येणार्या कोणत्याही मेसेजेचही खात्री करुन घ्या. कोणतेही संदेश हे अधिकृत स्त्रोतांकडून खात्री करुन घेतल्याशिवाय पुढे पाठवू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा संपूर्णपणे सतर्क आहे, नागरिकांना काळजीचे कारण नाही, असे ते म्हणाले.
Tags:
Ahmednagar