नगर (दि.06) : बंगल्याच्या गेटमध्ये उभ्या असलेल्या 51 वर्षिय महिलेच्या गळ्यातील 17 ग्रॅम वजनाचे मिनीगंठण मोटारसायकलवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी बळजबरीने ओढून नेले. ही घटना पाईपलाईन रोडवरील सागर हॉटेल मागे असलेल्या समर्थनगर येथील साईकमल बंगला येथे गुरुवारी (दि.5) दुपारी दीड वाजता घडली.
सुनीता गणेश श्रीगादी (वय 51, रा.समर्थनगर, पाईपलाईनरोड) या त्यांच्या बंगल्याच्या गेटमध्ये दुपारी उभ्या असताना मोटारसायकलवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या जवळ मोटारसायकल नेवून अचानक त्यांच्या गळ्यातील 17 ग्रॅम 910 मि.ग्रॅ. वजनाचे मिनी गंठण हिसकावून चोरुन नेले.
या प्रकरणी सुनीता श्रीगादी यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 392, 34 प्रमाणे जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरसे हे करीत आहेत.
Tags:
Ahmednagar
