नगर : कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आगडगाव येथील काळ भैरवनाथ देवस्थानाजवळील अन्नछत्र मार्च महिन्यातील पुढील दोन्ही रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. त्यानंतरही परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल, असे देवस्थानच्यावतीने कळविण्यात आले आहे.
आगडगाव येथे गेल्या पंधरा वर्षांपासून प्रत्येक रविवारी बाजरीची भाकरी व आमटी असा महाप्रसाद दिला जातो. प्रत्येक रविवारी हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. महाराष्ट्रातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव देशभर होऊ लागल्याने गर्दी होऊ नये, यासाठी काळजी घेण्यात येणार आहे.

रविवारी होणारी गर्दी टाळण्यात येणार आहे. त्यासाठी पुढील दोन्ही रविवारी अन्नछत्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्नदानासाठी नावनोंदणी केलेल्या भाविकांचे अन्नदान त्यानंतरच्या रविवारी ठेवण्यात येईल. तसे संबंधितांना कळविण्यात येणार असल्याचे देवस्थानच्यावतीने सांगण्यात आले.
Tags:
Ahmednagar