तुमच्या कार्याचा होणार गौरव

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी : 24 मार्चपर्यत प्रस्ताव पाठवावे

नगर  : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या  महिला व संस्थांना  पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर राज्यस्तरीय , विभागीय व जिल्हास्तरीय पुरसकार  देण्यात येतो.  सन 2018-19 व 202019-2020  या वर्षाकरिता  इच्छूक महिला व संस्थांनी  जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी नगर यांच्याकडे  आवश्यक त्या कागदपत्रासह 24 मार्च 2020 पर्यत प्रस्ताव सादर करावेत.

राज्यस्तरीय पुरस्कार -या पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये  स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल श्रीफळ असून  महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 25 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. जया महिलांना जिल्हास्तरीय  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार , दलितमित्र पुरस्कार  अथवा सावित्रीबाई फुले पुरसकार प्राप्त झालेला आहे.  अशा महिला पाच वर्षापर्यत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र राहणार नहीत.

विभागीय पुरस्कार -  या पुरस्काराचे स्वरुप 25 हजार एक रुपये  स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल श्रीफळ असून महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 7 वर्षे  कार्य केलेले असावे. दलितमित्र पुरस्कार प्राप्त झालेला नसावा. संस्था राजकरणापासून अलिप्त असावी.

जिल्हास्तरीय पुरस्कार - या पुरस्काराचे स्वरुप दहा हजार एक  रुपये  स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल श्रीफळ असून महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 10 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना दलितमित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरसकार प्राप्त झालेला आहे त्या महिलांना जिल्हास्तरीय पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही. तसेच अधिका माहितीसाठी  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  सर्जेपूरा चौक, अहमदनगर (दूरध्वनी क्र. 0241-2431171) येथे संपर्क साधावा असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही आर माने यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post