नीला काणे यांचे निधन
नगर - दैनिक समाचारच्या वाटचालीत दीर्घ काळ योगदान दिलेल्या नीला
जनार्दन काणे यांचे आज मुंबईत घाटकोपर येथे वृद्धपकाळाने निधन झाले. त्या
84 वर्षांच्या होत्या. समाचारचे संस्थापक व दिवंगत माजी संपादक ज. स. तथा
जनुभाऊ काणे यांच्या त्या पत्नी व दिवंगत माजी संपादक सतीश काणे यांच्या
काकू होत.
श्रीमती नीला काणे समाचारच्या व्यवस्थापनात
दीर्घ काळ सक्रिय होत्या. समाचारच्या साठोत्तरी वाटचालीत त्यांचे मोठे
योगदान राहिले. त्यांच्या मागे मुलगी प्रा. मेघना केतकर, जावई शिरीष केतकर,
नातवंडे असा परिवार आहे.
गेल्या काही वर्षापासून
त्या मुलीकडे घाटकोपर येथे वास्तव्यास होत्या. तेथेच आज पहाटे श्रीमती नीला
काणे यांचे निधन झाले. सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात
आले. त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.
Tags:
Ahmednagar
