नगर - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व जिल्हा रुग्णालय, अहमदनगर येथे दर बुधवारी होणारी गर्दीचा विचार करता दिनांक 31 मार्च 2020 रोजीपर्यत दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप तसेच दर गुरुवारी देण्यात येणारे जेष्ठ नागरीक प्रमाणपत्र ( वयाचे दाखले) बंद राहणार आहेत.
दिनांक 31 मार्च 2020 रोजीनंतर शासनाच्या निर्देशानुसार वरील प्रमाणपत्र वाटपाबाबत पुढील दिनांक कळविण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
Tags:
Ahmednagar
