केरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या जिल्हाधिकार्‍यांच्या सुचना


नगर (दि.06) :कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी बूथ हॉस्पिटल आणि जिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष स्थापण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. त्यांनी बूथ हॉस्पिटल येथे जाऊन संबंधित कक्षाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.

सर्वत्र करून करोना व्हायरल विषय सुरू झाल् असतानाच आपल्या देशामध्ये सुद्धा याचा विषय सुरू झाला आहे .याची खबरदारी म्हणून आता येथे जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे नगर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी  समक्ष जिल्हा रुग्णालय जाऊन येथील आढावा घेतला आहे

 यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, महापालिका आरोग्य विभाग प्रमुख डॉ. बोरगे, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. नागरगोजे, बूथ हॉस्पिटलचे डॉक्टर्स उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post