छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊनच सरकारचे कामकाज : भाऊ कोरगावकर


छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊनच सरकारचे कामकाज : भाऊ कोरगावकर

नगर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच सरकार काम करत असून सर्वसामान्यांसाठी ज्या योजना आहेत त्या पोहचवुन सर्वसामान्य सुखी व समृध्द होण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आज सर्वांना न्याय देण्याचे काम सरकारच्या माध्यमातून होत आहे. शेतकर्‍यांची कर्जमाफी, युवकांचा रोजगाराचा प्रश्न, महिलांची सुरक्षिता यास सरकार प्राधान्य देत आहे. त्याच बरोबर शिवभोजनासारखा महत्वकांक्षी उपक्रम राबवून गरीबांना फक्त 10 रुपयांमध्ये शिवथाळी उपलब्ध करुन दिली आहे. अशाप्रकारे सर्वसामान्यांचे सरकार म्हणून काम सुरु असल्याचे प्रतिपादन शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी केले.

माळीवाडा शिवसेना शाखेच्यावतीने शिवजयंतीनिमित्त भव्य देखावा उभारण्यात आला आहे. सुरुवातीला  शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी  माजी नगराध्यक्ष अ‍ॅाड.अभय आगरकर, ज्येष्ठ नेते श्रीराम येंडे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेवक अनिल शिंदे, गणेश कवडे, संजय शेंडगे, दत्ता कावरे, अनिल बोरुडे, सचिन शिंदे, श्याम नळकांडे, संग्राम शेळके, हर्षवर्धन कोतकर, शिवाजी कदम, विनोद ताठे, प्रविण बेद्रे, दिपक पवार, दयानंद वाबळे, शेखर आढाव, रवी वडे, निंबाळकर, निघोजकर आदि उपस्थित होते. 

यावेळी संभाजी कदम म्हणाले, शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणाच्या अनेक सुविधा पुरविल्या, पैसा योग्य कामासाठी वापरला. राजांच्या इतिहासातील आदर्श आचार, विचार, संस्कार युवा पिढीत निर्माण व्हावेत. त्यांचा आदर्श आजच्या युवकांनी घ्यावा. समाजातील दृष्टप्रवृत्तीचा नाश करुन समाज हितासाठी काम करावे, असे आवाहन केले. याप्रसंगी अ‍ॅड.अभय आगरकर, श्रीराम येंडे, सुरेखा कदम, अनिल शिंदे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. 

Post a Comment

Previous Post Next Post