शिवसेना खासदार, आमदारांचा निर्धार;
मुख्यमंत्री सहायता निधीला एक महिन्याचे वेतन देणार
मुंबई (दि.27) : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून राज्यातील रुग्णांची संख्या 135 वर पोहोचली आहे. याच पार्श्वभूमीवर 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धांतावर चालणाऱ्या शिवसेनेने सामाजिक जबाबदारीचे भान राखत मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी हातभार म्हणून शिवसेनेचे सर्व आमदार व खासदार आपले एक महिन्याचे वेतन देणार आहेत. हा निधी मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये जमा केला जाणार आहे.
शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देत आहेत. कोरोना व्हायरस विरुध्दच्या लढाईत हा खारीचा वाटा आहे, असे ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे युद्ध आपण नक्की जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Tags:
Maharashtra