कोरोनाच्या दक्षतेसाठी निंबळकला औषध फवारणी
ग्रामस्थांना मास्कचे वाटप
नगर (दि.28) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात देखील धसका घेण्यात आला आहे. यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून निंबळक (ता. नगर) येथील ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना संसर्गजन्य रोगाच्या दक्षतेसाठी गावातील ग्रामस्थांना वाड्या - वस्तीवर जाऊन मास्कचे वाटप करुन कोरोना संदर्भात माहिती देण्यात आली. तर गावात ब्लोअरच्या सहाय्याने परिसराच्या निर्जंतुकीकरणासाठी सोडियम क्लोराइडची फवारणी करण्यात आली.
कोरोना विषाणूचा प्रार्दुर्भाव रोखण्यासाठी निंबळक ग्रामपंचायत शासनाच्या निर्देशानुसार लॉकडाऊन झाल्यापासून अनेक खबरदारीचे उपाययोजना राबवित आहे. गावातील मुख्य रस्ते, वसाहती व वाडी वस्त्यांवर निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी करुन कोरोना संदर्भात जनजागृती चालू आहे. गावातील मेडिकल, अन्नधान्य पुरवठा केंद्र, किराणा दुकान येथे सोशल डिस्टंसचा प्रयोग राबविण्यात येत आहे. तर नागरिक देखील सुचनांचे पालन करुन प्रतिसाद देत आहे.
तसेच बाहेर ठिकाणाहून आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का देऊन त्यांना घरातच थांबण्याचे निर्देश देयात आले असून, आरोग्य विभाग देखील त्यांच्यावर लक्ष ठेऊन असल्याची माहिती माजी सरपंच विलास लामखडे यांनी दिली.
गावात कोरोनाच्या दक्षतेसाठी विलास लामखडे, उपसरपंच घनश्याम म्हस्के, आरोग्य सेवक डॉ.दिगंबर कोल्हे, ग्रामसेवक अनिल भाकरे, परवीनबानो सय्यद, ग्रामपंचायत सदस्य नाना दिवटे, बाबा पगारे, अशोक शिंदे, महसुलचे रामदास शिंदे, अशोक पवार, छबू कोरडे, सुभाष कोरडे, बबन कदम, रुक्मिणी रोकडे, कमल कदम, नवाझ शेख, साहेबराव मदने, रुपाली होळकर परिश्रम घेत आहे. या उपक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे.
Tags:
Ahmednagar