नगर (दि.२७) : अहमदनगरच्या झीन मेडिकल इक्विपमेंटस् या फर्ममध्ये श्रीपाद पुणतांबेकर आणि गणेश जोशी या दोन अभियंत्यांनी व्हेंटिलेटर तयार केले आहे. भारतीय बनावटीच्या तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेऊन हे दोन अभियंते गेल्या दोन वर्षांपासून परिश्रम घेत होते. त्यांच्या चिकाटीला, परिश्रमाला यश आले आहे. त्यांचे व्हेंटिलेटर रुग्ण सेवेसाठी तयार आहे.
पुणतांबेकर हे मेकॅनिकल इंजिनियर असून व्हेंटिलेटर विक्री आणि पश्चात सेवा क्षेत्रात त्यांना बारा वर्षांचा अनुभव आहे, तर गणेश जोशी हे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहेत. त्यांना प्रोग्रामिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयात नैपुण्य आहे. या व्हेंटिलेटरमध्ये आधुनिक पद्धतीच्या मोड सुद्धा दिलेल्या आहेत आणि वापरायला सुलभ असे मशीन हे आहे. या व्हेंटिलेटरमध्ये सीएमव्ही मोडसोबत असिस्ट मोड नि एसआयएमव्ही मोड हे दोन अद्ययावत मोड आहेत. अाधुनिक टर्बाइन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने मशीनचा आकार लहान आहे.
Tags:
Ahmednagar
