त्या चौघांची तपासणी मात्र, लक्षणे नाहीत
प्रशासन सज्ज : अफवांवर विश्वास ठेवू नका अवाहन
नगर : दि.1 मार्च 2020 रोजी दुबईवरुन जिल्हयात चार रहिवासी असलेले आहेत. याबाबत प्रशानाला माहिती मिळाली असता प्रशासनाने यांची चौकशी करुन त्यांची तपासणी केली आहे. त्यांच्यामध्ये करोनाचे कोणतेही लक्षणे आढळले नसल्याचा दावा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केला. तसेच नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
दुबईहून व इतर ठिकाणवरुन राज्यात परतलेल्या लोकांची यादीच समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. यामध्ये नगर येथील चौघेजन दुबई ट्रिपवरुन परलेले असल्याचे समोर आले. प्रशासनाने त्यांची खबरदारी घेत चौघांना शोधून तपासणी केली. मात्र, त्यांच्यामध्ये कोणतेही लक्षणे आढळली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. परतलेल्या त्या चौघांची तपासणी करण्यात आली. एकंदरीतच नगर जिल्ह्यात बुधवार दि.11 मार्चपर्यंत एकही कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आलेला नाही अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
तसेच ते म्हणले,, नागरिकांनी अफवांना बळी न पडता आरोग्याची काळजी घ्यावी, परिसर स्वच्छ ठेवावा, प्रशासन सज्ज असून नागरीकांनी अफवांना बळी पडु नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी केले आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
Tags:
Ahmednagar
