मुंबई : झी मराठीवाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात दाखवण्यात आलेला फोटो हा वेगळ्या अर्थाने दाखवण्यात आला होता. हा फोटो शाहू महाराजांचा नव्हता. तांत्रिक गोष्टींतून ही चूक झालेली असून झालेल्या प्रकाराबाबत आम्ही क्षमस्व आहोत, अशी शब्दात डॉ. निलेश साबळे यांनी माफी मागितली आहे.
‘चला हवा येऊ द्या’ हा विनोदी कार्यक्रम घराघरात पोहोचला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे ही नावे आता प्रत्येकाच्या परिचयाची झाली आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाचा प्रत्येक भाग आवर्जून पाहिला जातो. या कार्यक्रमात मराठी आणि हिंदी चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी अनेक सेलिब्रेटी हजेरी लावतात. नुकतेच सुबोध भावे आणि दिग्दर्शक सुभाष घई ‘विजेता’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात उपस्थित राहिले होते.

पण या भागात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांची विटंबना झाल्याची भावना छत्रपती शाहू महारांजांप्रती आदर व्यक्त करणा-या शाहूप्रेमींनी व्यक्त केली होती. एवढेच नव्हे तर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करून लिहिले होते की, लोकप्रियतेची हवा डोक्यात शिरली की माणूस विक्षिप्त वागतो. या प्रकाराबाबत निलेश साबळेने जाहीर माफी मागावी असे आवाहनही त्यांनी केले होते. त्यानंतर साबळे यांनी माफी मागून या वादावर पडदा टाकला आहे.
Tags:
Maharashtra