मनपा कर्मचार्‍यांना त्वरित मास्क द्या: बारस्कर


नगर :  सध्या कोरोना या संसर्गजन्य आजाराने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये याचा संसर्ग होवू शकतो, यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच मनपा कर्मचार्‍यांनाही आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असून, त्यांना त्वरीत मनपाने मास्कचे वाटप करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांनी केली आहे.

कोरोना या आजाराने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे मनपा हद्दीत व उपनगरामध्ये करोना विषाणू बाबत उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. शहर परिसरात औषध फवारणी करावी. नागरीकांमध्ये या आजाराबाबत जनजागृती होण्याकरीता शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये फ्लेक्स बोर्ड लावण्यात यावे. नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, प्रत्येक नागरीकाने सॅनीटायझर, डेटॉल लिक्विड, साबणाने हात स्वच्छ धुवावेत. तसेच मास्कचा वापर करावा, महानगरपालिकेच्या घंटागाडयांच्या स्पिकरव्दारे कोरोना व्हायरस विषयी जनजागृती करण्यात यावी. अशी मागणी होत आहे. तसेच महानगरपालिकेच्या सर्व कर्मचार्‍यांना कामानिमित्त शहर व उपनगरांमध्ये फिरावे लागते.

महानगरपालिकेचे दैनंदिन कामकाज करतांना कर्मचार्‍यांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तरी कोरोना या आजारापासून नागरीकांचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने तातडीने सर्व कर्मचार्‍यांना मास्कचे वाटप तात्काळ करावे अशी मागणी मनपाचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post