नगरमध्येही न्यायालयीन कामकाजाच्या वेळेत बदल


नगर : सार्वजनिक ठिकाणी दक्षता घेण्यासाठी न्यायालयीन कामकाजाच्या वेळ कमी करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा व सत्र न्यायालयाने परिपत्रक काढले आहे.

कोणत्याही प्रकारचा संसर्ग न पसरण्यासाठीची दक्षता घेण्याच्या दृष्टीने प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश, अहमदनगर यांनी सोमवारी (दि.16) रोजी एक परिपत्रक काढुन नगर जिल्ह्यातील सर्व न्यायालयीन कामकाजाची वेळ कमी केली असुन सकाळी 11 ते दुपारी 2 अशी वेळ करण्यात आली आहे. या वेळेत जामीन अर्ज, मनाई हुकूमाचे अर्ज व रिमांड सारख्या प्रकरणांची सुनावणी होणार आहे, असे परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे. तसेच कामा व्यतिरिक्त विधिज्ञांनी गर्दी करण्याचे टाळावे व त्यासाठी न्यायालयास सहकार्य करावे, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post