छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवल्या प्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या
शिवसेनेची शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षकांकडे मागणी
नगर : येथील प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. सदरचे गुन्हे मागे घ्यावे, यासाठी शिवसेनेच्या वतीने शहर विभागाचे पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांना निवेदन देऊन सदरचे गुन्हा मागे घ्यावे अशी मागणी केली आहे.
शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. यावेळी माजी शहरप्रमुख संभाजी कदम, आनंद शिंदे, सचिन शिंदे, राजेंद्र राठोड, संग्राम शेळके, संग्राम कोतकर आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये संभाजी महाराजांचा पुतळा बसवा या मागणीचा ठराव झालेला होता. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नव्हती, याअगोदर वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहेत. मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याने संभाजी महाराजांवर प्रेम करणार्या संघटनांनी दोन दिवसापूर्वी मध्यरात्री पुन्हा पुतळा बसला होता. पोलिस प्रशासन व महापालिका प्रशासनाने तो पुतळा हाटवला आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. हे गुन्हे पोलिसांनी मागे घ्यावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Tags:
Ahmednagar