मानवसेवेचे व्रत मानवसेवा प्रतिष्ठानने जपले : हभप तनपुरे


101 ज्येष्ठ, विधवा, घटस्फोटिता, परितक्त्या, अपंग महिलांना साड्यांचे वाटप

नगर : मानवसेवेचे व्रत मानवसेवा प्रतिष्ठान जपत आहे. प्रत्येकाने समाजातल्या प्रत्येक गरजवंत मानवासाठी कार्य केले पाहिजे. आपण समाजाचे देणे लागतो. समाजाचे ऋण फेडण्यासाठी समाजसेवा केलीच पाहिजे, मानवसेवा हिच खरी ईश्‍वर सेवा आहे.असे प्रतिपादन राष्ट्रीय संत ह.भ.प. बद्रिनाथ महाराज तनपुरे यांनी केले.

मानवसेवा प्रतिष्ठानने जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ग्रामीण भागातील 101 ज्येष्ठ महिला, विधवा, घटस्फोटीता, परितक्त्या, अपंग महिलांना साड्यांचे वितरण व स्नेहभोजन आशीर्वाद मंगल कार्यालयात देण्यात आले.

याप्रसंगी सत्यभामा तनपुरे, जि.प. सदस्या संध्या आठरे, जि.प.सदस्या मोहनराव पालवे, मा.सभापती संभाजी पालवे, आदर्श अंगणवाडी सेविका अलका मतकर, द्रौपदाबाई मतकर, देविदास मतकर, सरपंच अलका वांढेकर, चेअरमन रामकिसन वांढेकर, मुख्याध्यापिका संगीता भापसे, संगीता शेळके, डॉ. अविनाश म्हस्के, अ‍ॅड. महेश शिंदे,पोपटराव बनकर,अ‍ॅड. अनिता दिघे, अ‍ॅड.भानुदास होले, नयना बनकर, रजनी ताठे, सागर आलचेट्टी व मानवसेवाचे अध्यक्ष प्रा. सुनील मतकर उपस्थित होते.

यावेळी अ‍ॅड. भानुदास होले व अनेक महिलांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अ‍ॅड. महेश शिंदे यांनी मार्गदर्शित केलेल्या ’जगमित्र’ या विशेषकांचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील मतकर यांनी तर आभार शुभम मतकर यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post