लालपरीचे स्टेअरींग आता महिलांच्या हाती


नगर (दि.08) : दि.8 मार्च हा महिला दिवस साजरा होत असताना आज महिला ह्या देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचे दिसत आहे. महिलांनी आता सर्वच क्षेत्रामध्ये यशस्वी पणे जबाबदारी पार पाडत आहे, सध्या एसटी महामंडळाच्या वाहनावरही त्या स्वार होण्यासाठी प्रशिक्षण घेत असून प्रशिक्षण  पुर्ण होताच त्या सेवेत रुजू होणार आहे. सरळ सेवा भरती प्रक्रिया 2019 अंतर्गत भरतीमध्ये सुनंदा सोनवणे, सोनाली भागडे, आशा खंडीझोन  या प्रशिक्षण घेत आहेत. लवकरच त्यांचे प्रशिक्षण पुर्ण होऊन त्या सेवेत रुजु होणार आहे.

सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवत असताना आता त्यांनी एसटी महामंडळातही आपली ओळख निर्माण केली आहे. एसटीची स्टेंअरींग हाती घेऊन त्यांनी नवीन ओळख समोर ठेवली आहे. राज्यामध्ये महिलांची चालकपदासाठी निवड झाली असून त्या सध्या प्रशिक्षण घेत आहेत. यामध्ये औरंगाबाद, नाशिक, नगर, धुळे, जळगाव, जालना, परभणी विभागातील  एकुण 32 महिलांचा समावेश आहे. प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर या महिला सेवेत रुजू होणार आहे.


 
खाकी वर्दीचे स्वप्न पुर्ण: सोनवणे
एम.ए.बी.एड होऊनही शिक्षक होण्यापेक्षा पोलिस भरती व्हावे ही इच्छा असताना, खाकी वर्दीचा आदर कायम होता. आपणही देशसेवेसाठी काहीतरी करावे आणि खाकी वर्दी परिधान करावी ही मनोमनी असलेली इच्छा लवकरच पुर्ण होत आहे. खाकी वर्दी व वाहन चालविण्याची आवड ही दोन्ही स्वप्ने पूर्ण झाली असून घरातून विरोध होत होता, परंतु तो आता मावळला असून आता सर्वांचा पाठिंबा मिळत आहे असे त्या सांगतात.

सुनंदा सोनवणे (रा.कपिलनगर, औरंगाबाद )

नोकरीसाठी पतिचे प्रोत्साहन : भाकडे
नोकरी करण्याचे स्वप्न होते. मात्र, लग्नानंतर ते धूसर होणार असे वाटत होते. ग्रॅज्यूएशन झाल्यानंतर नोकरीचे स्वप्न अधूरे राहिले, असे वाटत असताना पतीने नोकरीसाठी प्रोत्साहन देवून पुन्हा उभारी दिली. लवकरच स्वप्न पूर्ण होत असल्याने माहेरच्या मंडळी बरोबरच सासारच्या मंडळींनी देखील मला प्रोत्साहन देऊन संधी उपलब्ध करुन दिली.

सोनाली भाकडे (रा.वारंघुशी,ता.अकोले)

पती बरोबरच आई-वडिलांच्या प्रेरणेने स्वप्नपूर्ती
मी ग्रामिण भागात राहत असल्याने जिवनाचा प्रवास आणि वाहणांचा प्रवास तसा महत्त्वाचाच असे, आमच्या गावात एसटी थांबत नव्हती. लहान पणापासूनच एसटी विषयी आवड होती. एसटीमध्ये नोकरी करावी असे स्वप्न कायम होते. त्या दृष्टीने आई वडील यांच्या प्रेरणेमधून सदैव प्रयत्न केले. आई-वडिल अपंग असले तरी त्यांनी माझे व माझ्या भावांचे शिक्षण केले. त्यानंतर माझे शिक्षण केले, लग्न केले. त्यानंतर स्वप्नपूर्तीसाठी काम करत राहिले यातुन पती आणि आईवडिलांच्या प्रेरणेने स्वप्नपूर्ती झाली.

आशा खंडीझोन (रा.शहापूर,ता.कोपरगांव)

Post a Comment

Previous Post Next Post