चित्रकार भरतकुमार उदावंत यांची संसर्गजन्य कोरोणा बचावासाठी धडपड !



नगर  : नेवासा फाटा येथील सुप्रसिद्ध चिञकार भरतकुमार उदावंत यांची चिञकलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याची नेहमीच धडपड सुरु आसते.विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाप्रसंगी ते चिञकलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत आसतात.तरुणांनी व्यसनाच्या आहारी जावू नये म्हणूनही ते कधी चिञ रंगवतात तर कधी दुष्काळातील शेतकरी संकटांचा सामना करतांनी ते दाखवून देतात,गणेशोत्सव काळात हिडीस पणा बाबत जनजागृती करतात.

  सध्या कोरोणा संसर्गजन्य रोगाच्या प्रचार आणि प्रसारासाठी काय काळजी घ्यावी याबाबत ते चिञकलेच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत.त्यांनी रेखाटलेल्या बोलक्या चिञातून समाज जागृती करत आसून त्यांच्या चिञकलेतून समाज प्रबोधनाबाबत सर्वञ कौतूक होतांना दिसून येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post