नगर बाजार समितीच्या सभापतीपदी घिगे तर उपसभापतीपदी म्हस्के


नगर : माजी खासदार दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अभिलाष घिगे तर  उपसभापतीपदी संतोष म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले आणि विधान परिषद सदस्य तथा आमदार अरुण जगताप यांच्या मार्गदर्शनाली ही निवडणूक पार पडली आहे. त्यांनी  अभिलाष रावसाहेब घिगे तर उपसभापतीपदी संतोष रामदास म्हस्के यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



शुक्रवाद दि.13 मार्च रोजी बाजार समिती च्या सभागृहात दुपारी 1 वाजता ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. घिगे यांचे नाव  सभापतीसाठी निश्‍चित होते, उपसभापती पदासाठी खरी रस्सीखेच होती. परंतु शेवटच्या टप्प्यात उपसभापती पदासाठी म्हस्के यांच्या नाववर शिक्कामोर्तब झाले. माजी सभापती हरिभाऊ कर्डीले, बाबासाहेब खरसे, बन्सी कराळे दोन्ही पदासाठी इच्छुक होते परंतु समजूत काढण्यात आली. आणि ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली.



बाजार समितीच्या वतीने नूतन  सभापती, उपसभापती यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, आमदार अरुण जगताप, अक्षय कर्डीले, माजी सभापती विलास शिंदे, उपसभापती रेश्मा चोभे यांच्यासह संचालक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post