लॉकडाऊन कालावधीत नागरिकांनी निर्देशांचे पालन करावे
नागरिकांच्या सोईसाठी नगर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित
तहसीलदार उमेश पाटील यांची माहिती
नगर (दि. 28) : नगर शहर व तालुक्यात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून नगर तहसील कार्यालय यांचे मार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरु केल्या असून लॉकडाऊन कालावधीत नागरिकांची प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार उमेश पाटील यांनी केले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणुन नागरिकांच्या सोयीसाठी नगर तहसील कार्यालय येथे 24 x 7 कोरोना कंट्रोलरुम (नियंत्रण कक्ष) स्थापन करण्यात आला. याबाबत नागरिकांना काही समस्या असल्यास किंवा मार्गदर्शन हवे असल्यास त्यांनी 0241-2411600 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.
लॉकडाऊन कालावधीत शहरात व ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा किराणा दुकान, दुध, फळे, भाजीपाला, औषधांचे दुकान, दवाखाने, कृषीसेवा केंद्र, पेट्रोलपंप, एलपीजी गॅस इ. सेवा सुरुळीतपणे चालू आहेत. सेवांचा लाभ घेताना विक्रेते व ग्राहक यांनी सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्मस पाळणे आवश्यक आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणे व गर्दी करणे याबाबत पोलीस विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असुन लॉकडाऊन कालावधीत नागरिकांनी घरी राहणे अनिवार्य आहे. कायदेशीर तरतु्दीचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर भारतीय दंड संहीता 1860 चे कलम 188 व भारतीय साथ रोग प्रतिबंध अधिनियम 1897 नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे

Tags:
Ahmednagar