कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळे व भाजीपाला बाजार: 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश


नगर (दि.24) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून भाजी बाजारावे ठिकाणी नागरीकांची होणारी गर्दी टाळणेसाठी कृषि उत्पन्न बाजार समिती, अहमदनगर येथील फळे व भाजीपाला बाजार भरणेस दि. 31 मार्चपर्यंत पर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले असून त्याची तात्काळ अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

कोणतीही व्यवती/संस्था/संघटना यांनी उक्ल आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) घ्या कलम 188 नुसार दंडनिय / कार्यदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे या आदेशात म्हटले आहे. कोव्हीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी य त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे,  त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी  म्हणून जिल्हाधिकारी यांना घोषीत करण्यात आलेले आहेत. त्यास अनुसरुन हे आदेश जारी करण्यात आले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post