'देवदूतां'च्या मदतीला सिद्धिविनायक
'लॉकडाऊन'मध्ये पोलिसांसाठी जेवणाची सोय
मुंबई (दि.26) : लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या देवदूतांच्या मदतीला ‘सिद्धिविनायक’ धावून आला. श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून पोलिसांना जेवण, पाणी यांची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
लॉकडाऊनच्या काळातही पोलिस आपलं कर्तव्य चोख पार पाडत आहेत. अशावेळी तहानभूक हरपून ते काम करतात. मात्र अन्न पाण्याअभावी त्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून देवाने दानपेटी उघडली आहे.
मुंबई पोलिसांना मदतीचा हात म्हणून ‘श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास’ धावून आला आहे. न्यासातर्फे लॉकडाऊनच्या काळात दादर, नायगाव, वरळी भागात कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलिस आणि वाहतूक पोलिसांना जेवण, पाणी सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. ‘श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासा’चे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी या कामात पुढाकार घेतला आहे.

‘कोरोना’शी दोन हात करण्यासाठी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या काळात केवळ जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठीच सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडण्यास मुभा आहे. 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊनचा कालावधी असेल.
Tags:
Maharashtra