आज रात्री 12 वाजतापासून 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन; पंतप्रधान मोदींची घोषणा
अफवांवर विश्वास ठेवू नका
नवी दिल्ली (दि.24) : ‘कोरोना’ या साथीच्या आजारापासून देशाला संक्रमित होण्यापासून रोखण्यासाठी देशाला मोठे युद्ध लढावे लागणार आहे. देशाला कोरोनापासून वाचविण्यासाठी देश लॉकडाऊन करणे हाच एकमेव उपाय आहे. कोरोना म्हणजे - कोई रोड पे ना निकले ही सोशल मीडियावरच्या पोस्टचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या गंभीर स्थितीवर भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी आज रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण देशात 21 दिवस लॉकडाऊन केल जात आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला आणि त्यांच्या कुंटुंबीयांना वाचवण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. हा जनता कर्फ्यूच्या पुढील टप्पा असेल, असंही त्यांनी नमूद केलं. यानुसार घराच्या बाहेर पडण्यावर बंदी असणार आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले, आज रात्री 12 वाजल्यापासून संपुर्ण देशात 21 दिवस लॉकडाऊन होत आहे. भारताला वाचवण्यासाठी, भारताच्या प्रत्येक नागरिकाला वाचवण्यासाठी, तुम्हाला, तुमच्या कुंटुंबीयांना वाचवण्यासाठी आज रात्री 12 वाजल्यापासून प्रत्येक राज्याला प्रत्येक केंद्रशासित प्रदेशाला, जिल्हा, गाव, गल्ली प्रत्येक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली.
त्याचप्रमाणे, अहोरात्र सेवा देणार्या डॉक्टर, नर्सेस, पोलीस, मीडिया यांंच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले.
कोणत्याही प्रकारच्या अफवांपासून दूर राहा !
सरकारनं केलेल्या सूचनांचं पालन करणं गरजेचं
* 21 दिवसांचा लॉकडाऊन हा मोठा काळ आहे. मात्र, तुमच्या सुरक्षेसाठी, कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी महत्वाचा आहे.
* आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, करोना व्हायरसचं जाळं तोडण्यासाठी 21 दिवसांचा काळ महत्त्वाचा आहे.
* घराची लक्ष्मणरेखा पार केली नाही तरच करोनाचं संक्रमण थोपवता येईल .
Tags:
Maharashtra