बँका-पतसंस्थांनी 31 मार्चपर्यंत फक्त पैसे काढणे, भरणा करणे एवढेच काम करावे


बँका-पतसंस्थांनी 31 मार्चपर्यंत फक्त पैसे काढणे,
पैसे  भरणा करणे एवढेच काम करावे : जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

नगर (दि.24) : सर्व बँका, पतसंस्थांनी दि. 31 मार्चपर्यंत फक्त रोख भरणा करणे व काढणे ही दोनच कामे प्राधान्याने करावीत. या कामासाठी बँकानी पुरेसे कर्मचारी नेमावेत. जेणेकरुन ग्राहकांना बँकेच्या शाखेमध्ये कमीत कमी वेळ व्यतीत करता येईल. बँकानी एक वेळेस जास्तीत जास्त 4 ते 5 ग्राहकांना शाखेमध्ये येण्यास परवानगी द्यावी व प्रवेश केलेल्या ग्राहकांचे काम झाल्याशिवाय पुढील ग्राहकांना बँकेमध्ये परवानगी देण्यात येऊ नये. दोन ग्राहकांमध्ये रांगेत एक मीटर इतके अंतर ठेवावे. सर्व बँकांनी आपआपल्या ग्राहकांना इतर वितरण पर्यायांचा म्हणजेच इंटरनेट बॅकींग, मोबाईल बँकीग व युपीआर एटीएम कॅश डिपॉजीट मशीन इत्यादी सुविधांचा वापर करण्यासाठी जागृती करण्यात यावी. बँकेत ग्राहकांना कांऊटरपासून एक मीटर अंतर ठेवण्याबाबत सुचित करावे व सर्व बँकांनी आपआपले एटीएम कॅश चेक डिपॉजीट पासबुक प्रिंटींग इ सेवा असणार्‍या मशीनची वेळोवेळी स्वच्छता करावी. तसेच सर्व कर्मचार्‍यांना व ग्राहकांना सॅनीटायझर, साबण व पाण्याने हात स्वच्छ धुण्यासाठी व्यवस्था करावी, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.

कोरोना विषाणूचे प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एका संक्रमीत रुग्णाकडून अन्य व्यक्तीस / इसमास त्याच्या संपर्कात आलेने होण्याची शक्यता विचारात घेता.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना एक भाग म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील सर्व बँका, पतसंस्था यांना हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post