अजिम राजे यांच्या पुढाकाराने सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव

 
 
अजिम राजे यांच्या पुढाकाराने सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव
 
व्यक्तिपेक्षा सामाजिक कार्याचे कौतुक महत्वाचे : फैय्याज केबलवाले

नगर (दि.14) : समाजात आज अनेकजण स्वत: आणि कुटूंब या चौकटीतच राहत आहेत. परंतु त्या व्यतिरिक्त समाजातील गरजू-गरजवंतांना मदत करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहत आणण्याचे काम अनेक कार्यकर्ते करत आहेत. आपले व्यवसाय, नोकरी सांभाळून समाजासाठी वेळ देऊन मदत करत आहे, त्यांच्या कार्याचे कौतुक झाले तर त्यांनाही काम करण्यास उत्साह येतो, त्याचबरोबर इतरांनी सामाजिक काम करण्याची प्रेरणा मिळते. हा सत्कार व्यक्तीचा नसून सामाजिक कार्याचा आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक फैय्याज केबलवाले यांनी केेले.

अहमदनगर शहर समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष अजिम राजे यांच्या पुढाकाराने सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या विविध संघटनांचे व सामाजिक कार्यकर्त्यांचे सामाजिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक फैय्याज केबलवाला बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मिरा बिल्डर्सचे संचालक इरफान जहागिरदार, युवा नेते शम्स समीर खान, प्रा.अमिर जनाब, अशफाक सर, राजू जहागिरदार आदि उपस्थित होेते. 
 
यावेळी रुग्णमित्र नादीर खान, ज्येष्ठ समाजसेवक कुतुबुद्दीन जनाब, अहमदनगर सोशल फौंडेशनचे नईम सरदार, अहमदनगर युवा फौंडेशनचे अल्तमश जरीवाला, आर्कि.फिरोज शेख, रहेमत सुलतान फौंडेशनचे युनूस तांबटकर, नासिर सर, युवा पुरस्कारप्राप्त भैय्या बॉक्सर, मखदुम सोसायटीचे आबीद दुलेखान, ए.टीव्हीचे अमिर सय्यद आदिंचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रास्तविकात अजिम राजे म्हणाले, समाजवादी पक्षाच्यावतीने नेहमीच नागरिकांच्या प्रश्‍नांना प्राधान्य दिले आहे. सर्वसामान्यांना येणार्‍या अडचणी सोडविण्याची पक्षाची नेहमीच भुमिका राहिले आहे. यासाठी वेळोवेळी आंदोलनेही केली आहे. त्याचबरोबर सामाजिक
 
कामातही पक्षाचे कार्यकर्ते सक्रीय असतात. समाजच्या भल्यासाठी झगडणार्‍या या कार्यकर्त्यांनी विविध क्षेत्रात नि:स्वार्थपणे काम केले आहे, त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शफकत सय्यद यांनी केले तर आभार समीउल्लाह खान यांनी मानले. कार्यक्रमास फैरोज पठाण, मतीन तांबोळी, पटेल साहब, फारुक बागवान, अमिर सय्यद, रफिक मोगल, समीर बेग, तन्वीरभाई भंगारवाले, उजेरखान तांबटकर, तारिक शेख, युनूस पार्टी, शादाब गनी आदि उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post